ChatGPT वापरुन नव्हे, त्याबद्दलची माहिती सांगून तरुणाने ३ महिन्यात कमावले २८ लाख रुपये, कसं ते जाणून घ्या
सध्या अनेक लोक आपलं काम सोपं करण्यासाठी ChatGPT चा वापर करतात.
सध्या जगभरात chatgpt या चॅटबॉटची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अनेकजण या चॅटबॉटला टेक्नॉलॉजी क्षेत्रातले भविष्य समजत आहे. तर हा चॅटबॉट नोकरदारांसाठी धोका असल्याचंही म्हटलं जात आहे. अशातच आता या AI Chatbot मुळे एका व्यक्तीने तीन महिन्यात लाखो रुपये कमावले आहेत. तो ChatGPT मुळे नेमका कसा श्रीमंत झाला ते जाणून घेऊया.
सध्या अनेक लोक आपलं काम सोपं करण्यासाठी ChatGPT चा वापर करत आहेत. पण एका व्यक्तीने मात्र लोकांना ChatGPT बद्दल माहिती सांगून लाखो रुपये कमवले आहेत. मागील वर्षा अखेरीस लान्स जंक नावाच्या व्यक्तीने एक ऑनलाइन कोर्स सुरू केला होता. जो Udemy वर उपलब्ध असून ज्यामध्ये त्याने अनेक लोकांना ChatGPT तसे वापरायचे याबाबतची माहिती सांगितले आहे.
तीन महिन्यांत १५ हजार विद्यार्थ्यांनी लान्स जंकचा कोर्स जॉईन केला. रिपोर्टनुसार, लान्सचा कोर्स ChatGPT मास्टर क्लास (A Complete ChatGPT Guide for Beginners) चा नफा जवळपास ३५ हजार डॉलर म्हणजेच सुमारे २८ लाख रुपये दाखवत आहे. ऑस्टिनमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चॅटजीपीटीचा वापर केला होता. चॅटजीपीटीच्या क्षमतेने लान्स जंकचे लक्ष वेधून घेतलं. हा बॉट सर्वांना उपलब्ध व्हावा अशी आपली इच्छा होती असंही त्यांने सांगितले आहे. शिवाय त्याने चॅटजीपीटीबद्दल शिकण्यास खूप वाव असल्याचंही म्हटलं होतं.
लान्स म्हणाला, ‘मला वाटते की अनेक लोक ChatGPT ला घाबरतात, म्हणून मी ते सर्वांना वापरायला आवडेल असा बनवण्यासाठई प्रयत्न केला.’ त्याने सांगितले की सुरुवातीला तो बॉटसोबत तासनतास घालवत होता. तो त्याला कादंबरीसाठी प्रस्तावना लिहायला सांगायचा तर कधी एखाद्या उत्पादनाचे वर्णन करायला सांगायचा. या सगळ्यातून तो बॉट कसा वापरायचा हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.
कोर्समध्ये विशेष काय आहे?
ChatGPT वर लान्स जंकचा ७ तासांचा कोर्स आहे. त्याची किंमत २० डॉलर आहे, ज्यामध्ये ५० व्याख्यानांचा समावेश आहे. ही सर्व व्याख्याने तयार करण्यासाठी लान्सला ३ आठवडे लागले होते. चॅटजीपीटी प्रॉम्प्ट कसे लिहिलेले असतात, यापासून सुरुवात होते. तर पुढे व्यवसाय, विद्यार्थी आणि प्रोग्रामरसाठी विशिष्ट चॅटजीपीटी अॅप्लिकेशन्सबद्दल सांगण्यात आलं आहे.