Government Schemes

Adhar Card Pan Card Link आधार कार्ड पॅनकार्ड कशे करावे घरबसल्या मोबाईलवर लिंक ?

आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (Pan-Aadhar Link) करणे बंधनकारक केले आहे. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 ही अखेरची मुदत आहे. या मुदतीत हे काम केले नाही तर तुमचे पॅन सक्रिय राहणार नाही.

पॅनला आधारशी लिंक (Pan-Aadhar Link) करणे अनिवार्य आहे. प्राप्तिकर विभागाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, अंतिम तारीख लवकरच येत आहे. उशीर करू नका, आजच पॅनला आधारशी लिंक करा. 31 मार्च 2023 पर्यंत लिंक न केल्यास पॅन 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय होईल. तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक करू शकत नसाल तर तुम्ही आयकर रिटर्न भरू शकणार नाही किंवा पॅन संबंधित सेवा वापरू शकणार नाही. तसेच विमा किंवा म्युच्युअल फंड खरेदी करू शकणार नाही.

एसएमएसद्वारे लिंक करा

– प्रथम UIDPAN (स्पेस) 12 अंकी आधार क्रमांक (स्पेस) पॅन क्रमांक टाईप करा

– तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवा.

तुम्हाला पॅनशी आधार लिंक करण्यासाठी मेसेज मिळेल.

ऑनलाइन लिंक करा

– प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट eportal.incometax.gov.in किंवा incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्या.

– तुम्ही आधीच नोंदणीकृत नसल्यास प्रथम नोंदणी करा.

– तुमचा पॅन आणि आधार क्रमांक तुमचा वापरकर्ता आयडी म्हणून सेट केला जाईल.

– पोर्टलवर तुमचा यूजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख सह लॉग इन करा.

– तुमच्‍या स्‍क्रीनवर एक पॉप अप नोटिफिकेशन दिसेल जे तुम्हाला आधारशी पॅन लिंक करण्‍यास सांगेल.

– सूचना येत नसल्यास, ‘क्विक लिंक्स’ विभाग उघडा.

– होमपेजवर आधार लिंक निवडा.

– तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक भरा आणि चेकबॉक्सवर क्लिक करा.

– स्क्रीनवर कॅप्चा कोड भरा.

– सर्व माहिती दिल्यानंतर, तुम्हाला पॅनशी आधार लिंक करण्यासाठी पुष्टीकरण सूचना मिळेल.

– तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

– तुमच्या पॅन आणि आधारमध्ये दिलेल्या माहितीमध्ये फरक असेल तर प्रथम तुम्हाला तुमची आधार किंवा पॅन माहिती अपडेट करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *