Technology

तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील Google Assistant हे फिचर बंद कसे करायचे माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

गुगल असिस्टंट सारख्या व्हर्च्युअल असिस्टंटने लाखो स्मार्ट डिव्हाइस युजर्सचे जीवन सोपे केले आहे.

गुगल असिस्टंट सारख्या व्हर्च्युअल असिस्टंटने लाखो स्मार्ट डिव्हाइस युजर्सचे जीवन सोपे केले आहे. हे युजर्सना हँड्सफ्री पद्धतीने अनेक कामे करण्याची मोकळीक देते, ज्यामुळे दैनंदिन कामे करणे सोपे होते. या कामांमध्ये रोबोट व्हॅक्यूम क्लिनर नियंत्रित करणे, दिवे बंद करणे यासारख्या दैनंदिन कामांचा समावेश होतो.

Google असिस्टंट हे फिचर गुगल प्ले सेवा असणाऱ्या अँड्रॉइड फोनवर डिफॉल्टनुसार सक्षम करता येते. गुगल असिस्टंट असण्याचे अनेक फायदे असले तरी काहीजण हे फिचर बंद करण्यास जास्त महत्व देत असतात. आता हे फिचर आपल्या फोनवर कसे बंद करायचे ते आज आपण जाणून घेणार आहोत. Samsung, Oppo, Vivo, Realme, Xiaomi, Redmi आणि यासारखा ब्रँडच्या कोणत्याही फोनवर सारख्याच स्टेप्स फॉलो कराव्या लागतात.

Google Assistant बंद करण्याच्या स्टेप्स

१. जर का तुम्हाला तुमच्या फोनमधील गुगल असिस्टंट हे फिचर डिसेबल म्हणजेच बंद करायचे आहे तर सर्वात पहिल्यांदा google App वर जावे.

२. त्यानंतर गूगल पर्यायावर क्लिक केल्यावर उजव्या बाजूला वरती आपल्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करावे. त्यानंतर पुढील मेनूमध्ये आपल्या फोनवररील गुगल असिस्टंट फिचर बंद करण्यासाठी Settings > Google Assistant वर क्लिक करावे.

गुगल असिस्टंट (Image Credit-The Indian Express)

३. एकदा का तुम्ही त्यावर क्लीक केले की खाली स्क्रोल करून सर्व सेटिंगमध्ये जनरल हा पर्याय निवडावा. तसेच पुढील पेजवर असलेले toggle बंद करावे.

Toggle या पर्यायावर क्लिक केले असता तो पर्याय तुमच्या फोनमधील Google असिस्टंट हे फिचर बंद करेल. जर का तुमच्या एकापेक्षा अधिक फोन असतील व त्या सर्व फेन्वे तुम्हा हे फिचर बंद करायचे असेल तर तुम्हाला याच स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

एकदा का तुम्ही तुमच्या फोनमधील हे फिचर बंद केले की, तुम्ही “Hey Google” हे व्हॉइस सर्च असिस्टंट सारखे फिचर देखील वापरू शकणार नाही. तसेच तुम्ही ambient मोड आणि स्नॅपशॉट या सेवांचा देखील वापर करू शकणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *