Educational

MPSC Recruitment 2023: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘या’ १४६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, महत्वाच्या तारखा याबाबतची माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात(MPSC) लवकरच काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. आयोगाकडून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना २ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, महत्वाच्या तारखा याबाबतची माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी (महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ) या पदासाठी भरती जाहीर केली आहे. तर या भरती अंतर्गत जवळपास १४६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती एमपीएससीने जाहिरात क्रमांक 017/2023 मध्ये दिली आहे.

१४ वर्षे मोठ्या अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ, ५ वर्ष होऊनही आई बनू शकत नव्हती सुप्रसिद्ध अभिनेत्री, आता गुडन्यूज देत म्हणाली, “माझी पाळी…”

एकूण रिक्त पदे – १४६

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.

आरक्षित प्रवर्गाला ५ वर्ष सूट देण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क –

खुला प्रवर्ग – ३९४ रुपये.

आरक्षित – २९४ रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात १० एप्रिल २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ मे २०२३

उमेदवारांनी अर्ज भरण्यापुर्वी  या लिंकवरील जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी आयोगाच्या https://www.mpsc.gov.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *