Government Schemes

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘आत्ता’ सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याची मागणी नुकतीच महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे, याबाबत महासंघाने मुख्यमंत्री यांचे निवास्थान वर्षा येथे 6 एप्रिल 2023 रोजीच्या झालेल्या बैठकीत Retirement age of Government Employees कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्ती वय हे साठ वर्ष करण्याबाबत चर्चा झाली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याबाबत सविस्तर माहिती पाहूया…

सरकारी कर्मचाऱ्यांचे ‘सेवानिवृत्ती’ वय 60 वर्षे करण्याची मागणी

Retirement age : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती हे 60 वर्ष करावे याबाबत राज्य सरकारी कर्मचारी राजपत्रित अधिकारी महासंघाने नुकतीच 6 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन याबाबत मागणी केली, त्याबरोबर जुनी पेन्शन योजना आर्थिक लाभ मिळण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली यावर मुख्यमंत्री सकारात्मक असून त्यांनी अनुकूलता दर्शवली आहे.

या बैठकीतील चर्चेमध्ये सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे 60 वर्षे करावे, महसूल विभागीय संवर्ग वाटपाच्या अधिनियमातून पदोन्नती अधिकाऱ्यांना वगळणे, सेवानिवृत्ती लाभ केंद्राप्रमाणे 20 लाख करणे, 80 वर्षे वयावरील वरिष्ठ सेवानिवृत्तांना केंद्र सरकार प्रमाणे निवृत्तिवेतन वाढ देणे आदी विषयावर चर्चा झाली.

‘सेवानिवृत्ती’ वयाबाबत मत मतांतरे

सरकारी कर्मचार्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष करावे अशी मागणी असताना आता सेवानिवृत्ती वय कमी करण्यात येऊ नये अशा मागणीचे पत्र सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

‘सेवानिवृत्ती’ वय वाढवल्यामुळे तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाही, कारण दरवर्षी साधारणपणे 3 टक्के कर्मचारी Retirement होतात. त्यामुळे दरवर्षी साधारणपणे 48 हजार पदे रिक्त होतात, त्यामुळे जर निवृत्तीचे वय 2 वर्षाने वाढवले तर जवळपास 1 लाख रिक्त होणाऱ्या जागा ह्या तरुणांना मिळणार नाही.

त्यामुळे सरकारी कर्मचार्यांचे निवृत्ती वय वाढवू नये असे पत्र राज्य सरकारला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय निर्णय घेणार ते पहावे लागेल..

सेवानिवृत्ती वय आणि पेन्शन योजना

जुनी पेन्शन योजना (OPS) 2003 मध्ये बंद करून नवीन पेन्शन योजना (NPS) 2004 त्यावेळच्या सरकारने सुरु केली. त्यानुसार सर्वच राज्यांनी केंद्र सरकारप्रमाणे राज्यात NPS योजना लागू केली.

पुढे कर्मचार्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी वाढू लागली, त्यामुळे अनेक राज्यात राजकीय पक्षांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा आणण्याचे आश्वासन देण्यास सुरुवात केली.

राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड व पंजाब या राज्यात नवीन पेन्शन योजना (NPS) नंतर पुन्हा जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला.

नुकतेच महाराष्ट्र व हरियाणा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली, राज्य सरकारने याबाबत अभ्यासगट नेमून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

आयुर्मान कमी असताना सेवानिवृत्ती वय सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयुर्मानात अपेक्षित वाढ झाल्यामुळे निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याची मागणी होत आहे. सरासरी आयुर्मान हे 70 वर्ष इतके झाले आहे.

त्यामुळे सेवा निवृत्ती वय देखील केंद्राप्रमाणे करावे अशी मागणी होत आहे. उलट ही मागणी मान्य झाल्यास कर्मचार्यांच्या दीर्घ अनुभवाचा आणि क्षमतेचा पुरेपूर वापर होणार आहे.

आयुर्मान वाढले, आता सेवा निवृत्ती वय वाढवण्यास हरकत नाही – संशोधन

सेवानिवृत्तीचे वय वाढवावे की नाही, यावरून राज्यातच नाहीतर संपूर्ण जगभरामध्ये याबाबत चर्चा सुरू आहेत. नुकतेच बोस्टन कॉलेज मधील  (Boston College, Gal Wetstein) गॅल वेटस्टीन यांनी केलेल्या आयुर्मान विषयावरील संशोधनानुसार व्यक्तीचे सरासरी आयुर्मान हे 70 वर्ष झाले आहे. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत हे आयुर्मान वाढले आहे.

सेवानिवृत्ती हा विषय प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा असून, सेवानिवृत्तीचा परिणाम हा व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील होतो असे संशोधन सांगते. तज्ञ सांगतात की, ज्यावेळी सेवानिवृत्ती होते तेव्हा काही लोक काम करणे बंद करतात तेव्हा, त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते.

संशोधनानुसार सेवानिवृत्तीचे वय जेवढे जास्त तेवढे ते चांगले आहे, कारण तज्ज्ञांच्या मते, नोकरीशी संबंधित शारीरिक हालचाल थांबणे व सामाजिक संपर्क कमी होणे हे निवृत्तीनंतर होणाऱ्या घसरणीची मोठी कारणे आहे. संशोधन सविस्तर येथे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *