Government Schemes

DA increase news :- आताची सगळ्यात मोठी बातमी:- राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! 42 टक्के महागाई भत्ता मिळणार वाढून

आताची सगळ्यात मोठी बातमी

नमस्कार मित्रांनो आपण आताची नवीन आणि सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चार टक्के वाढ केली आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. आता 42 टक्के एवढा महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत शासनाने घेतला हा मोठा निर्णय.. चला तर पाहूया सविस्तर मध्ये हा निर्णय कशा प्रकारचा आहे.

March Payment : राज्य कर्मचाऱ्यांना आगामी आठ ते दहा दिवसात मार्च महिन्यातील वेतन मिळणार आहे.

7 एप्रिलपासून राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन मिळण्यास सुरुवात होणार आहे. अशातच राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत एक मोठी माहिती हाती येत आहे.

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होऊन आता तो 38% वरून 42 टक्के करण्यात आला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात घोषित वाढ होणार आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की, राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना अर्थातच OPS पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने सर्व राज्य कर्मचाऱ्यांना लागू करा.

DA increase news आताची सगळ्यात मोठी बातमी

वास्तविक हा एक बेमुदत संप होता मात्र राज्य कर्मचाऱ्यांना शासनाकडून जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.

दरम्यान त्यावेळी शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या संप काळातील रजेबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असा आश्वासन देखील देण्यात आल होत.

मात्र आता राज्य शासनाने संपात सामील झालेल्या जवळपास 17 ते 18 लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपकाळात गैरहजर असल्याने वेतनात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

28 मार्च 2023 रोजी याबाबतचा शासन निर्णय देखील राज्य शासनाकडून निर्गमित झाला आहे. त्यामुळे हा 18 लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना फटका असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की संप काळात सहभागी कर्मचाऱ्यांचा तो काळ खंडित न करता असाधारण रजा म्हणून त्याला मान्यता देण्याचे काम 28 मार्च रोजी करण्यात आले आहे.

असाधारण रजा म्हणजे रजा कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे वेतन / भत्ते कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येत नाहीत.

संप काळातील कालावधी खंडित न समजता असाधारण रजा मंजूर करून एक प्रकारे राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला असला तरी देखील त्यांच्या वेतनात कपात होणार आहे.

DA increase news आताची सगळ्यात मोठी बातमी

म्हणून हा निर्णय पुन्हा बदलला जावा आणि राज्य कर्मचाऱ्यांना त्या कालावधीमधलही वेतन मिळावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

यासाठी वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.

यामुळे आता या निर्णयावर शासन फेरविचार करते का आणि कर्मचाऱ्यांना संपकाळाच देखील वेतन देते का याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.DA increase news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *