Aadhar-Pan : ३० जूनपर्यंत आधारला पॅन लिंक करा, अन्यथा…जाणून घ्या काय म्हणाल्या अर्थमंत्री
आधार कार्डशी पॅन लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या आर्थिक दंडाच्या तरतुदीचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समर्थन केले आहे. यापूर्वी आधारला पॅन लिंक ( Aadhar-Pan ) करण्यासाठी १ एप्रिल २०२२ पासून ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली होती. आता ती एक हजार रुपये करण्यात आली आहे. ही मूदत ३० जूनर्पंत वाढविण्यात आली आहे. मात्र त्यानंतर काय होईल, या बाबात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ( दि. ६ ) पत्रकार परिषदेत माहिती दिली.
… तर आर्थिक दंडात होणार वाढ
या वेळी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, ” यापूर्वी आधार-पॅन लिंक करण्यासाठी खूप वेळ दिला गेला आहे. पॅनला आत्तापर्यंत आधारशी लिंक करायला हवे होते. ज्यांनी आजपर्यंत तसे केले नाही त्यांनी त्वरित करावे. सध्या निश्चित केलेली मुदत संपल्यास दंडाची रक्कम आणखी वाढवली जाईल.”
केंद्रीय अर्थमंत्रालयाने २८ मार्च रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार, प्रत्येकाने आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. या नियमाचे पालन न करणार्यांना TDS आणि TCS दावे मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
Aadhar-Pan लिंक करण्याची मूदत ३० जूनपर्यंत वाढवली
प्राप्तिकर कायदा, १९६१ अंतर्गत ज्यांना १ जुलै २०१७ पर्यंत पॅन कार्ड जारी करण्यात आले आहे आणि ते आधार कार्डसाठी पात्र आहेत, त्यांनी ३१ मार्च 2023 पर्यंत आधार आणि पॅन लिंक करावे. सध्या पॅनला आधारशी लिंक करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेले नाही, त्यांचा पॅन १ जुलै २०२३ पासून निष्क्रिय होईल, असा इशाराही अर्थ मंत्रालयाने दिला होता.
Finance Minister Sitharaman defends imposing fine for not linking PAN with Aadhaar
Read @ANI Story | https://t.co/Q8Cqu192lg#NirmalaSitaraman #PAN #Aadhaar pic.twitter.com/LCjknkD7J4
— ANI Digital (@ani_digital) April 6, 2023