हातात पैसा नाही म्हणे व्यवसाय करतोय म्हणत मित्र उडवायचे खिल्ली … आता २१ कंपन्यांचा मालक असून तब्बल ४५० कोटींची आहे संपत्ती
आजकाल तरुणांच्या हाताला काम नाही व्यवसाय करायला जवळपास पैसा नाही त्यामुळे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण व्यवसाय करायला पैसा लागत नाही हे एका युवकाने करून दाखवलं आहे. त्या व्यवसायिकाचे नाव आहे “संतोष चव्हाण”. नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल अनेक मराठी नाटक, चित्रपट, वेबसीरीजची तो निर्मिती, दिग्दर्शन तसेच अभिनय देखील करताना पाहायला मिळतो. इतकंच नाही तर मराठी कलाकारांच्या क्रिकेटचे सामने देखील तोच भरवतो. आता आम्ही जर असं म्हणालो कि हा पट्ठ्या 10 ते 12 वर्षा पूर्वी 10 बाय 10 च्या पत्र्याच्या घरात राहत होता तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे अगदी खरं आहे. हातात पैसा नसताना देखील व्यवसाय कसा करायचा हे ह्या तरुणाने सिद्ध करून दाखवत आज जवळपास तब्बल ४५० कोटींची संपत्ती उभी केली आहे. आज महागड्या ब्रँडच्या जवळपास सर्वच गाड्या त्याच्याकडे आहे. पण हे सगळं शक्य कास झालं ते पाहुयात…
संतोष चव्हाण हा पुण्यातील तळवडे भागातील रुपीनगर मधील एका छोट्याश्या चाळीतला मुलगा. शालेय जीवनापासूनच संतोषला अभिनयाची तसेच खेळाची भारी आवड, शाळेत गॅदरिंगमध्ये हमखास भाग घेऊन अनेक बक्षिसे देखील पटकवायचा. परिस्तिथी अगदी बेताची असल्यामुळे १० वी झाल्यावर आता पुढील शिक्षणासाठी पैसे हवे म्हणून कुठेतरी काम करणं गरजेचं होत. मग कुणीतरी सुचवलं (केटरिंग )लग्नात जेवण वाढप्याचं काम आहे करणार का म्हणून विचारलं पैश्याची गरज असल्याने लगेच त्याने होकार दिला. काहीदिवस काम करताच त्याने तिथे आपल्या शाळेतील मित्रांना देखील कामाला लावल. तिथेच त्यांची टीम तयार झाली आणि त्याच्या डोक्यात आता ह्या व्यवसायाच खुळंच निर्माण झालं. मित्रांना हा व्यवसाय आपण स्वतः करू शकतो असं सुचवलं. नुकतीच १० वी झाली राहतो पत्राच्या घरात खिशात पैसाअडका नाही अन ह्याला व्यवसाय करायचाय ह्यावर सगळ्यांनी त्याची खिल्ली उडवली. पण आता हा व्यवसाय करायचाच हे मनाशी पक्क केल त्याच मित्रांना घेऊन त्यानं कॉन्ट्रॅक्ट देखील मिळवलं तर दुसरीकडे नाटकात देखील वेळ मिळेल तशी छोटीमोठी कामे तो करत राहिला. मनमिळावू स्वभाव चेहऱ्यावर कायम स्मित हास्य आणि कामातील एकनिष्ठता ह्यामुळे संतोष अनेकांशी जोडत गेला. हीच जोडली गेलेली माणसे त्याला पुढे आवर्जून कामे देऊ लागली. आता हातात पैसा देखील होता आणि मार्केटमध्ये चांगल नाव देखील झालं होत.
“स्वर आर्ट अँड फिल्म इन्स्टिटयूट ” आणि “स्वेअर ग्रुप ऑफ कंपनीज”ची स्थापना त्याने केली. अनेक मराठी नाटकांची चित्रपटांची तसेच वेबसिरीजची निर्मिती आज स्वर मधून केली जाते. २०१२ साली संतोषने शेअर मार्केटचे संपूर्ण शिक्षण घेतले. २०१६ साली त्याने अनेक गुतांवणूकदारांना घेऊन”ट्रेड वर्ल्ड” कंपनी देखील स्थापन केली. कोरोना काळात जिथे अनेकांना अडथळे येत होते ह्याच काळात त्यांना मोठा फायदा देखील झाला. आज विविध कंपण्यांचे जवळपास ७५० कोटींचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत. इतकंच नाही तर अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देखील दिल. समाजसेवा म्हणून तब्बल ५० फॅमिली त्यांनी दत्तक घेतल्या आहेत. पिंपरी चिंचवड भागात मोफत ऍम्ब्युलन्स सेवा देखील चालवतात. हा सर्व आढावा घेत बालगंधर्व परिवार तर्फे कला गौरव पुरस्कार, कलादर्पण अवॉर्ड, बिजनेस आयकॉन अवॉर्ड, इतकंच नाही तर युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका बिजनेस मॅनेजमेंट अँड सोसिअल वर्क मधून त्यांना डॉक्टरेट डिग्री बहाल करण्यात आली आहे. संतोषची पत्नी श्रावणी हीच देखील त्याच्या यशात मोठा वाटा आहे. श्रावणी डेव्हलपर्स त्या त्या सर्वेसर्वा आहेत. स्वर आणि सर्वेश अशी २ मुले त्यांना आहेत. पत्राच्या घरात राहणारा संतोष आज मोठ्या मेहनतीने कोट्याधीश झाला आहे. व्यवसाय काढायला पैसा लागत नाही हे आज तो मोठ्या दिमाखात लोकांना सांगताना पाहायला मिळतो. “मॅन ऑफ द वर्डस” म्हणून संतोष चव्हाण ओळखले जातात.