Explainer: राज्य सरकारकडून का बंद करण्यात आलं डीएड? मग आता शिक्षक व्हायचं तरी कसं? बघा रोडमॅप
नक्की डीएड बंद का झालं? आणि आता शिक्षक होण्यासाठी करावं काय लागणार? कसं घ्यावं लागेल शिक्षण? आज आम्ही तुम्हाला याचा संपूर्ण रोडमॅप सांगणार आहोत.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारनं डिप्लोमा इन एज्युएकेशन म्हणजेच डीएड हा कोर्स कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या इतर भागांतही डीएड बंद करण्यात आलं आहे. . राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली आहे. यामुळे हा बदल आवश्यक मानला जात आहे. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांच्या कालावधीचे असतील. पण नक्की डीएड बंद का झालं? आणि आता शिक्षक होण्यासाठी करावं काय लागणार? कसं घ्यावं लागेल शिक्षण? आज आम्ही तुम्हाला याचा संपूर्ण रोडमॅप सांगणार आहोत.
भारत सरकारनं नॅशनल एज्युएकेशन पॉलिसीला मान्यता दिली आहे त्यामुळे आता या संदर्भातील सर्व अमलबजावण्या सुरु आहेत. याच अंतर्गत डीएड कोर्स बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता नवीन शैक्षणिक धोरणामुळे आता शिक्षक होण्यासाठी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांची बीएड पदवी घ्यावी लागणार आहे.
बीएडचे विद्यार्थी कोणत्याही विषयात स्पेशलायझेशन करू शकतील. चार वर्षांची पदवी त्यानंतर सहा महिन्यांची इंटर्नशिप करावी लागणार आहे.
हे नवीन धोरण राज्यातील सर्व बिगर कृषी विद्यापीठांमध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून काही महिन्यांत लागू होणार आहे. त्यामुळे हे सर्व बदल आगामी सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू होणार आहे.
सध्या हे धोरण डी.एड किंवा बीएडचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू होणार नाही आणि त्यांचे अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी एका वर्षात बीएड करू शकणार आहेत.
Bएड पदवी अभ्यासक्रम पदवीनंतर दोन वर्षांत पूर्ण करता येतो. बारावीनंतर बीएड करायला आतापासून चार वर्षे लागतील. दहावीनंतर डी.एड करून शिक्षक होण्याचा शॉर्टकट आता संपणार आहे.
मात्र यामुळे आता सहज उपलब्ध होणारे डी.एड शिक्षक उपलब्ध होणार नाहीत, काही वर्षे समस्या असतील. शिक्षक होण्याचा कमी खर्चिक मार्ग बंद होईल. डी.एड बहुतेक महिला होत्या, त्यांच्या करिअरवर परिणाम होईल.