IAS ते MBBS तब्बल 20 पदव्या आणि 42 विद्यापीठांमध्ये प्रवेश; भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तीबद्दल ऐकलंय का?
तब्बल 20 पदव्या होत्या. तब्बल 42 विद्यापीठांमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. पण नक्की हे व्यक्ती नक्की होते तरी कोण? जाणून घेऊया भारतातील सर्वात शिकलेल्या व्यक्तीबद्दल.
शिक्षण म्हंटलं की आजकालची मुलं आधीपासूनच विरोधात असतात. ग्रॅज्युएशन डिग्री झाली शिक्षण पूर्ण झालं असं समजतात. मात्र तुम्हाला आज आम्ही अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्यांनी स्वतःचं आयुष्य शिक्षणाला वाहून दिलं होतं. तसंच त्यांच्याकडे तब्बल 20 पदव्या होत्या. तब्बल 42 विद्यापीठांमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. पण नक्की हे व्यक्ती नक्की होते तरी कोण? जाणून घेऊया भारतातील सर्वात शिकलेल्या व्यक्तीबद्दल.
आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्याबद्दल. ज्यांच्याकडे वैद्यकीय डॉक्टरची पदवी देखील होती. ज्यांच्याकडे कायद्याची पदवीही होती. शिवाय त्यांनी आयएएसची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. यात नवल नाही. अशी व्यक्ती फक्त भारतातील आहे. ज्यांना देशातील सर्वात शिक्षित व्यक्ती म्हटले जाते. भारतात सर्वाधिक शिक्षित व्यक्ती म्हणून लिम्का बुक पुरस्कारासह त्यांना गौरान्वित करण्यात आलं होतं.
डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचा जन्म 1954 मध्ये नागपुरातील शेतकरी कुटुंबात झाला. त्याच्या अभ्यासादरम्यान एक वेळ आली जेव्हा त्यांनी तब्बल 42 विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला होता आणि तब्बल 20 डिग्री घेऊन उत्तीर्ण झाले होते.
विशेष म्हणजे त्यांना बहुतेक परीक्षांमध्ये प्रथम विभाग किंवा सुवर्णपदक मिळाले. जिचकार हे पहिले आयपीएस झाले. यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
1980 मध्ये जिचकार वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेवर पोहोचले. असे करणारे ते त्यावेळचे सर्वात तरुण नेते होते. यानंतर एमएलसी आणि राज्यसभा सदस्यही झाले. इतकी पात्रता असलेल्या जिचकार यांना महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपदाची संधीही मिळाली. त्या काळात त्यांच्याकडे 14 मंत्रालयांचा कार्यभार होता.
जिचकार त्यांच्या ग्रंथालयासाठीही प्रसिद्ध होते. या ग्रंथालयात 52 हजार पुस्तके होती. त्यावेळी सर्वाधिक ग्रंथसंग्रहाचा हा विक्रम असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय ते उत्तम छायाचित्रकार आणि अभिनेतेही होते.
जिचकार यांनी अनेक परीक्षा उत्तीर्ण केल्या. ही यादी आहे- वैद्यकीय डॉक्टर, MBBS, MD, LL.B, M.A. सार्वजनिक प्रशासन, M.A. समाजशास्त्र, M.A. अर्थशास्त्र, M.A. संस्कृत, एम.ए. इतिहास, M.A. इंग्रजी साहित्य, M.A. तत्वज्ञान, M.A. राज्यशास्त्र, M.A. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र, M.A मानसशास्त्र, LL.M, DBM MBA, पत्रकारितेत बॅचलर, डी. लिट. संस्कृत, IPS आणि IAS अशा अनेक डिग्री त्यांच्याकडे होत्या.