Jobs

Krushi Vibhag Aurangabad Bharti : छत्रपती संभाजी नगर कृषी विभाग येथे गट “क” साठी वरिष्ठ लिपिक व इतर पदांसाठी भरती, पगार 25500 ते 112400 रुपये

राज्य शासनाच्या कृषी आणि पदुम विभागातील विविध कार्यालयामध्ये गट क संवर्गातील वरिष्ठ लिपिक व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून,

या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज 06 एप्रिल पासून 20 एप्रिल 2023 पर्यंत सादर करावेत, अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत.

पदांचा तपशील
  • वरिष्ठ लिपिक – 11 जागा
  • सहाय्यक अधीक्षक – 04 जागा

शैक्षणिक पात्रता (Krushi Vibhag Aurangabad Bharti)

  • सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी असणे आवश्यक.
  • विधी शाखेची पदवी असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
  • पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वेतन श्रेणी

  • 25,500/- ते 1,12,400/- रुपये तसेच अनुदेय भत्ते लागू राहतील

वयोमर्यादा

  • वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक या पदासाठी किमान वय 18 वर्षे असावे कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापेक्षा व मागासवर्गीयांसाठी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)

अर्जाचे शुल्क (Krushi Vibhag Bharti)

  • अमागास प्रवर्ग – 720 रुपये
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/मा. सैनिक – 650 रुपये

अर्ज करण्याची पद्धत

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असून दिनांक 6 एप्रिल 2023 पासून अर्ज अधिकृत संकेतस्थळावर सादर करावेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख

  • विहित पद्धतीने मुदतीत म्हणजेच 20 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज सादर केले उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरण्याची कारवाई दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून 20 एप्रिल 2023 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
उमेदवारांसाठी सूचना
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असावा, जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या तारखेस मोजण्यात येईल.
  • परीक्षा स्थगित व रद्द करणे परीक्षेचे स्वरूप परीक्षेची तारीख व ठिकाणात बदल करणे पदसंख्या वाढ किंवा घट करण्याचे अधिकार विभागास राहतील व विभागाचा निर्णय अंतिम असेल.
  • उमेदवारांच्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना अर्हता बाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक नाही.
  • तथापि ऑनलाईन अर्ज मध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण खरी माहिती भरणे आवश्यक आहे.
  • परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात किंवा परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल कॅल्क्युलेटर, आयपॅड,इलेक्ट्रॉनिक यंत्र किंवा इतर संपर्काची साधने वापरण्यास सक्त मनाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *