मध्यरात्री रेल्वेतून उतरल्यावर सकाळपर्यंत तिथेच थांबल्यास प्लॅटफॉर्म तिकीट लागतं का? उत्तर जाणून घ्या
हा प्रवाशांच्या सुरक्षिततेशी निगडीत प्रश्न आहे, त्यामुळे रात्री उशिरा ट्रेनचा प्रवास संपवून स्टेशनवर थांबून सकाळची वाट पाहणं हा सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य निर्णय आहे.
भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत भारतीय रेल्वेचं योगदान मोठं आहे. रेल्वेने प्रवास करून लोक रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. बऱ्याचदा रेल्वे काही स्टेशनवर मध्यरात्री पोहोचतात. अशावेळी मध्यरात्री एखाद्या स्थानकावर उतरणारी व्यक्ती सकाळ होईपर्यंत स्टेशनवरच थांबते. या मागची कारणं मध्यरात्री प्रवासी वाहनं उपलब्ध नसणं आणि सुरक्षितता ही दोन असतात; पण जेव्हा तुम्ही अनेक तास स्टेशनवर थांबता, तेव्हा तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावं लागतं का? याचं उत्तर नेमकं काय आहे, ते जाणून घेऊयात.
प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावं लागेल का?
एक प्रश्न असाही पडतो की, जर कोणी रेल्वे स्टेशनवर पहाटे 2 वाजता उतरले आणि सकाळपर्यंत थांबलं तर त्याला प्लॅटफॉर्म तिकीट काढावं लागेल का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. बऱ्याचदा असं होतं की मध्यरात्री आपण एखाद्या स्टेशनला पोहोचतो, पण तिथून पुढे जायला आपल्याला प्रवासी वाहन किंवा बस मिळत नाही, त्यामुळे स्टेशनवर बसून सकाळ होण्याची वाट पाहावी लागते. ही परिस्थिती हिवाळ्यात विशेषतः लहान शहरांमध्ये बऱ्याचदा उद्भवते. लोक स्टेशनवर थांबतात आणि रात्र घालवतात व सकाळ झाल्यावर जिथे जायचं तिथे जाण्यासाठी निघून जातात.
हा प्रवाशांच्या सुरक्षिततेशी निगडीत प्रश्न आहे, त्यामुळे रात्री उशिरा ट्रेनचा प्रवास संपवून स्टेशनवर थांबून सकाळची वाट पाहणं हा सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य निर्णय आहे. या साठी रेल्वेने वेटिंग रूमही तयार केल्या आहेत. वेटिंग रुममध्ये प्रवाशांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था असते. त्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
जर तुम्ही स्टेशनवर रात्री 2 वाजता ट्रेनमधून उतरलात आणि सकाळपर्यंत तिथे थांबावे लागले तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागेल का? तर या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट घेण्याची गरज नाही. पण, तुमच्या मागील प्रवासाचे तिकीट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जेणेकरुन गरज असेल तेव्हा ते तिकीट तुम्हाला दाखवता येईल. त्या तिकीटाच्या आधारे तुम्हाला तिथे थांबता येतं, तुम्हाला वेगळं प्लॅटफॉर्म तिकीट काढायची गरज नाही.