WRD Maharashtra Bharti 2023: जलसंपदा विभागात नोकरीची मोठी संधी; ५ हजारांहून अधिक पदांसाठी होणार मेगाभरती
WRD Pune Recruitment 2022: जलसंपदा विभागात लवकरच ५५७० पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे.
WRD Maharashtra Bharti 2023: मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या भरतीची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जलसंपदा विभागाच्या ताज्या अपडेटनुसार लवकरच संचालक, उपसंचालक, सहायक संचालक इत्यादी पदांसाठी भरती सुरू करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. भरतीबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी जलसंपादन विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जलसंपदा विभागात लवकरच ५५७० पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय पारित झाला असून या अंतर्गत गट-क संवर्गातील अभियंता, लघुलेखक, सहायक अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या विभागात किती जागा भरल्या जाणार आहेत ते जाणून घेऊया.
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या औरंगाबाद परिमंडळात वर्ग ३ आणि ४ च्या मंजूर पदांपैकी ७५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. अशातच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने जलव्यवस्थापन, धरणे, कालव्यांची देखभाल दुरुस्ती करणे, शेतीला पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात, तर जलसंपदा विभाग मोठी धरणे बांधण्याचे काम करतो. हे दोन्ही विभाग गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतात.शिवाय या महामंडळातील अधिकारी, कर्मचारी दरमहा निवृत्त होत आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून या विभागात पदभरती झालेली नाही. यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळे एका अधिकाऱ्याकडे दोन किंवा अधिक पदांचा पदभार सोपविण्यात आला आहे. या रिक्त पदांचा अहवाल महामंडळाच्या दक्षता पथकाने नुकताच शासनास सादर केला आहे.