Educational

RTE Admission: प्रवेश प्रक्रिया 2023 करिता महत्त्वाच्या सूचना व पुढील प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या तारखा.

RTE Admission: बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:45 वाजता सन 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेची सोडत RTE Lottery निघाली. ज्या मुलांची निवड यादी मध्ये प्रवेशासाठी निवड झालेली आहे त्या मुलांच्या पालकांनी दिनांक 13 एप्रिल ते 25 एप्रिल यादरम्यान पंचायत समिती/महानगरपालिका येथे पडताळणी समितीकडे जाऊन आपली कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करावा.

बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. या पद्धती नुसार सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई (RTE Admission) अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची सोडत बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी 11 वाजून 45 मिनिटांनी जाहीर करण्यात आली.

या सोडती दरम्यान माननीय रणजीत सिंह देवल, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व माननीय श्री सुरज मांढरे, शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच शिक्षण विभागामधील अधिकारी कर्मचारी, एन आय सी पुणे येथील तांत्रिक तज्ञ, पत्रकार, पालक व संघटना शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावर्षी आरटीई 25% अंतर्गत पात्र 8828 शाळांमध्ये प्रवेश क्षमता 1 लाख 19 हजार 69 असून, मात्र प्राप्त ऑनलाईन अर्ज 3 लाख 64 हजार 390 होते.

दिनांक 12 एप्रिल 2023 दुपारी 3 नंतर ज्या मुलांची लॉटरी मध्ये निवड झालेली आहे. त्या मुलांच्या वडिलांनी त्यांनी अर्ज मध्ये नमूद केलेल्या मोबाईल नंबर वर एसएमएस पाठवले जातील. ज्या मुलांचे निवड यादी मध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे. या मुलांच्या पालकांनी दिनांक 13 एप्रिल 2023 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये आपल्या तालुक्याच्या पंचायत समिती/महानगरपालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन आपले कागदपत्रे तपासून आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करावा.

RTE Admission करिता आवश्यक कागदपत्रेयेथे क्लिक करा

RTE Admission प्रवेशासाठी हमीपत्रयेथे क्लिक करा

पडताळणी समितीकडे प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी दिनांक 30 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये शाळेत जाऊन आपल्या मुलाचा प्रवेश घ्यावा. आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली गेली असून प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीमध्ये निवड करण्यात आलेली आहे. पालकांनी RTE Admission 25% प्रवेश प्रक्रिया राबवणे बाबत कोणतेही दलाल संस्था यांच्या प्रलोभाना बळी पडू नये.

RTE Admission Important Notice

RTE Lottery 2023: आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा निकाल जाहीर, पुढे काय? असा पहा निकाल

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळणाऱ्या मुलाला कोणत्याही प्रकारे शाळेमध्ये वेगळी वागणूक दिली जाणार नाही किंवा त्यांच्याबद्दल भेदभाव केला जाणार नाही याची दक्षता शाळा विभागाने घेणे अनिवार्य आहे. RTE Admission 25% प्रवेश प्रक्रियेमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गळती होणार नाही. तसेच ही मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची सामाजिक दायित्व शाळा प्रशासनाचे राहील. RTE 25% प्रवेशबाबत पालकांची तक्रार असल्यास त्यांनी शासन निर्णय दिनांक 21 एप्रिल 2014 कायद्याअंतर्गत स्थापित झालेल्या तक्रार निवारण समितीकडे आपली तक्रार दाखल करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *