Uncategorized

महाराष्ट्र शासनाच्या या विभागात 177 जागांसाठी भरती अर्ज सुरु; 36,800 ते 1,22,800/-पर्यंत पगार दिला जाईल, इथे करा अर्ज…

DTP Maharashtra Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत मोठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 177 जागा

✍️ पदाचे नाव रचना सहायक (गट-ब)
✅️ शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षांची पदविका असणे आवश्यक आहे.
🙋🏻‍♂️ वयाची अट : अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

💰 परीक्षा फी : अराखीव प्रवर्गसाठी रु. 1000/- इतका अर्ज शुल्क आकारला जाणार असून राखीव प्रवर्ग यांसाठी रु. 900/- इतका अर्ज शुल्क आकारला जाणार आहे.
💸 पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 36,800 ते 1,22,800/-पर्यंत पगार दिला जाईल.
✈️ नोकरी ठिकाण :
या पदभारतीद्वारे पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती या सर्व विभागांमध्ये भरती केली जाणार आहे.

येथे क्लिक करून खालील pdf वाचा

🚨 महाराष्ट्र शासन भरतीची कागदपत्रे व अधिकृत PDF/जाहिरात पाहण्यासाठी उमेदवारांनी – येथे क्लिक करावे

👉🏻 अर्ज पद्धत : ऑनलाईन
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2023
📑 प्रवेशपत्र: 16 मे 2023 पासून
📮 परीक्षा (Online): 29 मे 2023

ऑनलाईन परीक्षा एकूण २०० गुणांची (प्रत्येकी २ गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे १०० प्रश्न) घेतली जाईल. त्यापैकी तांत्रिक प्रश्नांसाठी ८० गुण व मराठी + इंग्रजी + सामान्यज्ञान + बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास ३० गुण याप्रमाणे १२० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षा ही रचना सहायक पदासाठी निश्चित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेशी संबंधित अभ्यासक्रमावर आधारित व २ तासांची असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरुपाची असेल. बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय निवडावा. प्रत्येक योग्य उत्तरासाठी २ गुण व प्रत्येक चूकीच्या उत्तराबाबत एकूण २ गुणांच्या १/३ म्हणजेच ०.६६ गुण वजा याप्रमाणे परीक्षेमध्ये नकारात्मक गुणपद्धत (Negative Marking System) अवलंबिली जाईल. समान गुण मिळालेल्या उमेदवारांबाबत शासनाने निर्गत केलेल्या सूचनांच्या आधारे निर्णय घेण्यात येईल. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील

येथे क्लिक करून खालील pdf वाचा

🚨 महाराष्ट्र शासन भरतीची कागदपत्रे व अधिकृत PDF/जाहिरात पाहण्यासाठी उमेदवारांनी – येथे क्लिक करावे

🌐 अधिकृत संकेतस्थळ : www.dtp.maharashtra.gov.in
🚨 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
✅️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *