पॅनकार्डवरील फोटो व सही बदल करा आता घरूनच..!
पॅन कार्डावरील फोटो व सही बदल कसा करणार ??
आता पॅन कार्ड वरील फोटो आणि Signature देखील बदलता येणार – पहा कशी आहे संपूर्ण प्रोसेस
NSDL ने दिलेल्या माहितीनुसार – अनेक वेळा पॅन कार्ड वर असलेला फोटो आणि स्वाक्षरी योग्य नसल्यामूळे अनेक लोकांना खूप अडचणी येतात .
यामुळे पॅन कार्ड वरील फोटो आणि Signature मध्ये कसा बदल करायचा ते आपण या मेसेज मध्ये सविस्तर समजून घेऊ.
पहा कशी आहे प्रोसेस ?
सर्वात आधी NSDL च्या www.tin-nsdl.com या वेबसाईटवर जा – त्यात Application च्या पर्यायावर क्लिक करा – नंतर Correction च्या ऑप्शनला सेलेक्ट करा.
▪️ त्यानंतर Menu Category मध्ये Personal हा पर्याय निवडा – त्यानंतरआपल्याला ज्या माहितीचे करेक्शन करायचे आहे ती माहिती अचुक भरा – नंतर PAN Application वर क्लिक करून KYC च्या ऑप्शनवर क्लिक करा.
नंतर स्क्रिनवर Photo Mismatch and Signature Mismatch चा पर्याय दिसेल , त्यावर क्लिक करून योग्य फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा – त्यांनतर Declaration वर क्लिक करून सबमिट करा.
Fees किती असेल ?
पॅन कार्डच्या दुरूस्तीसाठी 101 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल – त्यानंतर त्याची प्रिंट काढून NSDL च्या ऑफीसला पोस्ट करा – नंतर काही दिवसांनी आपल्याला दुरूस्त झालेले पॅन कार्ड पोस्टाने पाठवण्यात येईल.